Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हार्स पावरचं कोडं उलगडलं

October 07, 2017

Search by Tags:  कविता

104/2017


हार्स पावरचं,
कोडं उलगडलं.

घोडं वज्यानं,
पार दमलं.
अख्या बाजाराला,
वेठीस धरलं.
पुढं बी जाईना.
मागं बी येईना.
मालकाला पार,
गाढव केलं.
हार्स पावरचं,
कोडं उलगडलं.

ट्रॅफिक एकदम,
जॅम झाला.
बोंबलणार्या हार्नचा,
तोल सुटला.
भारी बेंझ जागर,
काय खानार गाजर.
मालकाला घोड्यानं,
फेस आणला.
हार्स पावरची,
गाडी येगळी,
घोड्याची पावर,
निराळी.
हे त्या गाढवाला,
कसं कळंल.
हार्स पावरचं,
कोडं उलगडलं.

लोखंडी सळ्यांचं,
वजं पेलेना.
घोडं लटपटत व्हतं.
थरथरत व्हतं.
खाली बसायचं,
बाकी होतं.
वजनदार सळी,
बेरकी व्हती.
घोड्याला,
नि गाढवाला,
छळत व्हती.
घोडं हवेत,
तरंगू लागलं.
हार्स पावरचं,
कोडं उलगडलं.

मूकं जनावर,
काय करनार?
अडलं घोडं,
गाढवाचे पाय,
धरनार.
ना खायला,
देणार,
ना स्वतः,
खाणार.
सळी मालकाला,
मिळेल.
बळी मात्र,
घोड्याचा जाईल.
हार्स पावरचं,
कोडं उलगडलं.

हार्स पावर हार्स पावर.
जग होतं कावरं बावरं.
हे या घोड्याला कसं,
कळणार?
व्हिक्टोरिया गेली.
टांग्याची शान गेली.
शादी बारातही गेली.
ही भाजणूक आली.
अखेरची घरघर लागली.
हार्स पावर तशीच राहिली.

अशोक हवालदारSearch by Tags:  कविता
Top

ASHOK HAVALDAR's Blog

Blog Stats
  • 435 hits