Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

अरे, कुणी पुस्तक, छापता का पुस्तक. ..!

October 01, 2017

Search by Tags:  कविता

101/2017

अरे,
कुणी पुस्तक,
छापता का पुस्तक.


अरे,
कुणी पुस्तक,
छापता का पुस्तक.
या कवीचं.
एका होतकरू,
नव कवीचं.

छान नावाचं,
रंगीत कव्हरचं,
शुभ्र पानावर,
मोत्याच्या टाईपात.
अरे,
कुणी पुस्तक,
छापता का पुस्तक.

काळजाला हात,
घालणाऱ्या,
खुद्कन हसवणार्या,
विचार मांडणारं.
अरे,
कुणी पुस्तक,
छापता का पुस्तक.

मोठ्या आहेत,
पण रसाळ आहेत.
गरीबीच्या आहेत,
तशा श्रीमंताच्या,
पण आहेत.
खरं सांगणारं
अरे,
कुणी पुस्तक,
छापता का पुस्तक.

चोफडं परत करत,
म्हणतो प्रकाशक.
' कशाला करता,
उपद्व्याप.
तुमची म्हातारी,
कविता वाचणार कोण?'
'बाबा कसं कळणार,
तुला शब्दांतलं सारं.'
अरे,
कुणी पुस्तक,
छापता का पुस्तक.

थकलेला कवी,
स्वतःशीच असतो,
बोलत.
चिमुरडं पोर पेपर,
घेऊन येतं धावत.
' अजोबा,
पुरस्कार मिळालाय,
तुम्हांला.'
'पोरा,
या झाडाखाली,
हे चोपडं उघड.'
प्रकाशन झालं.

लोकांनी गर्दी केली.
प्रकाशकांनी धाव घेतली.
पोरानं उघडले.
कवीने डोळे मिटले.
'अजोबा. .अजोबा...!'
पुरस्काराचा पेपर,
फडफडत असतानाच,
धडधडही थांबली.
कायमची.

अशोकहवालदारSearch by Tags:  कविता
Top

ASHOK HAVALDAR's Blog

Blog Stats
  • 665 hits