Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

सेलिब्रिटी.....!

October 12, 2017

Search by Tags:  कविता

105/2017

सेलिब्रिटी.

आयुष्यात एकदातरी,
व्हा अशी सेलेब्रिटी.
असं काही तरी करा,
बदलेल तुमची पर्सनॅलिटी.

एक काम करा,
अभ्यासा अ‍ॅक्टिव्हिटी.
सिक्रेट त्यातच,
जिथं लागेल कसोटी.

अशक्य वाटेल,
पण नाही हरायचं
बॅलन्सड रहा.
सारं काही पचवायचं.

हळूहळू समजेल,
आपली स्पेशालिटी.
चमकू लागेल,
तुमची अ‍ॅक्टिव्हिटी.

तुमच्या कामाने,
ओळखले जाल.
कामाला तुमचा,
चेहरा मिळेल.

ते तेज तुमच्या,
चेहर्‍यावर येईल.
ही उर्जा शरीरात,
पसरेल.

तुम्ही सतत प्रकाशात,
असाल.
थकलेले कंटाळलेले,
नसाल.

पंचाहत्तरीतला तरुण,
पाहिलात.
उत्साहाचा झरा,
हसतमुख चेहर्‍यात.

लहान पडद्याने,
घराघरात पोहचला.
प्रत्येकालाच जवळचा,
वाटायचा.

अॅन्ग्री यंग मॅनला,
नवी ओळख मिळाली.
आपल्या फॅनशी,
जवळीक साधली.

तुम्हीही असेच व्हाल,
बघता बघता.
आकाशात झेपावाल,
जमीन न विसरता.

अशोक हवालदार
Search by Tags:  कविता
Top

ASHOK HAVALDAR's Blog

Blog Stats
  • 611 hits