Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ती मात्र आक्का होती.....!

October 05, 2017

Search by Tags:  कविता

103/2017

ती मात्र आक्का होती.

हीच ती तारीख होती.
सुरेख सकाळ होती.
कल्पनाच आली नाही.
घडणार्‍या घटनेची.
मोठ्या प्रवासाची,
तयारी चालली होती.
बोलत बोलत ती,
गुंगारा देत होती.
चटका लावून जाणारी.
ती मात्र आक्का होती.

गंमत पहा भरलेल्या,
घरात दोघंच होतो आम्ही.
कामवाली बाई आली.
घराची स्वच्छता झाली.
नर्स बाई हजर झाली.
आक्का जागी झाली.
स्वच्छ अंघोळ उरकली.
छान साडी नेसवली.
त्यांच्याशी बोलणारी,
ती मात्र आक्का होती.

सारं आवरून खुर्चीत,
छान अशी बसली होती.
देवघराकडे पहात,
तिनं हात जोडले.
' वेंकटरमणा गोविंदा.'
मनात प्रार्थना केली.
उषेची आठवण झाली.
ती खरी,
नशीबवान होती.
त्या दोघीशी बोलणारी.
ती मात्र आक्का होती.

' अशोका..अशोका..! '
मला हाक मारली.
' थोडसं पाणी दे.'
शांतपणे पाणी प्याली.
किलकिल्या नजरेने,
मंद मंद हसत होती.
माझ्या डाव्या हातावर,
अलगद विसावली.
आणि....पुढच्याच क्षणी.
उजवीकडे मान टाकली.
अगदी शांत शांत.....
न परतण्यासाठी.
अगदी कायमची.

अशोक हवालदार

Search by Tags:  कविता
Top

ASHOK HAVALDAR's Blog

Blog Stats
  • 836 hits